
लोकराज्य सर्वदूर पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे राबविण्यात आलेल्या लोकराज्य घरोघरी मोहिमेत उत्कृष्ट कामगिरी बजावणार्या अधिकार्यांचा महासंचालक प्राजक्ता लवंगारे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.मंत्रालयातील मिनी थिएटर येथे दोन दिवस माहिती अधिकार्यांच्या बैठकीचे आयेजन करण्यात आले होते. यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणार्या संचालक, उपसंचालक, जिल्हा माहिती अधिकार्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी संचालक (माहिती) प्रल्हाद जाधव, संचालक (माहिती)(प्रशासन) श्रद्धा बेलसरे, संचालक नागपूर विभाग भि.म.कौसल आदी उपस्थित होते.एकूण वर्गणीदार या विभागस्तरीय गटामध्ये सर्वात जास्त वर्गणीदार करुन उद्दिष्ट पूर्ण करणारे पुणे विभागाचे उपसंचालक वसंत शिर्के, कोकण विभागाचे उपसंचालक देवेंद्र भुजबळ तसेच अमरावतीचे उपसंचालक बी.एन.गवारी, औरंगाबादचे प्रभारी संचालक तथा उपसंचालक लातूर प्रमोद गवळी यांचा यावेळी गौरव करण्यात आला.लोकराज्यच्या वर्गणीदारांचे उद्दिष्ट पूर्ण करणार्या १५ जिल्हा माहिती अधिकार्यांनाही यावेळी गौरविण्यात आले. त्यामध्ये विजय पवार (रायगड-अलिबाग ), संभाजी गायकवाड (सोलापूर), सखाराम माने (सातारा), किरण मोघे (नांदेड), राजेंद्र सरग (पुणे), अनिल गडेकर (अमरावती), अनिल आलुरकर (यवतमाळ), नितीन मोकळ (जालना), ज्ञानोबा ईगवे (बीड), रवी गिते (बुलडाणा), विवेक खडसे (अ.का.) (भंडारा), प्र.रा.मुराळकर (ठाणे), गोविंद अहंकारी (औरंगाबाद), चंद्रकांत क्षीरसागर (अ.का.) (गोंदिया) आणि अंबादास म्याकल (हिंगोली) यांचा समावेश आहे.
तसेच संभाजी गायकवाड (सोलापूर), सखाराम माने (सातारा), म.ठ. गावित (जळगाव), डॉ.किरण मोघे (नांदेड), विवेक खडसे (अ.का.) (भंडारा), उत्तम मुंजाळे (अहमदनगर), दयानंद कांबळे (कोल्हापूर) आणि चंद्रकांत क्षीरसागर (गोंदिया) या १० पेक्षा जास्त गावे लोकराज्य ग्राम करणार्या अधिकार्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
तसेच लोकराज्य घरोघरी मोहीम राबविताना लोकराज्य शाळा हा उपक्रम राबविणारे बुलडाण्याचे जिल्हा माहिती अधिकारी रवि गिते यांचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला. लोकराज्य वर्गणीदार मोहिमेचे हे सातत्य कायम ठेवून शासनाच्या योजना लोकराज्यच्या माध्यमातून घरोघरी पोहोचविण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी सर्वांना महासंचालक प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी मार्गदर्शन केले. तसेच पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

No comments:
Post a Comment